educratsweb logo


सोनी सबवरील मालिका तेनाली रामा मध्‍ये शीर्षक भूमिका साकारणारा अभिनेता कृष्‍णा भारद्वाजने सांगितले आपले फिटनेस गुपित

  • तुझ्या मते फिटनेसचा अर्थ काय आहे?

माझ्यासाठी फिटनेस म्‍हणजे तंदुरुस्‍त वाटणे. फिटनेस म्‍हणजे पीळदार शरीरयष्‍टी किंवा अॅथलीट असणे नाही. मला आतून तंदुरूस्‍त, आरोग्‍यदायी व आनंदी वाटत असेल तर माझ्यासाठी ते फिटनेस आहे. सर्वात महत्‍त्‍वाची बाब म्‍हणजे स्‍वत:ला चांगले वाटणे आणि त्‍यामधूनच तुम्‍हाला तंदुरूस्‍त असल्‍यासारखे जाणवते. माझ्यासाठी फिटनेस हे पूर्णत: मानसिक स्थितीवर अवलंबून आहे.

  • तुझा फिटनेस मंत्र काय आहे?

माझा फिटनेस मंत्र म्‍हणजे सर्वकाही खावे, पण टप्‍प्‍याटप्‍प्‍याने व मर्यादित स्‍वरूपात खावे. सहजपणे पचन होईल असे पदार्थ खावेत आणि पदार्थ पचवण्‍यासाठी अतिरिक्‍त मेहनत करावी लागणार नाही.

  • तू तुझे मन व शरीरामध्‍ये आरोग्‍यदायी संतुलन कशाप्रकारे ठेवतोस?

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'मध्‍ये प्रमुख भूमिका साकारत असल्‍यामुळे मला अनेक संवाद लक्षात ठेवावे लागतात, जे कधी-कधी जटिल असतात. मन व शरीरामध्‍ये संतुलन राखण्‍यासाठी मी अधिक प्रमाणात चिंतन करतो. मी शूटिंग करत असताना देखील नियमितपणे चिंतन करतो. मी शांतता मिळण्‍यासाठी कधी-कधी माझ्या गुरूजींच्‍या आश्रमामध्‍ये देखील जातो. चिंतन माझ्या जीवनात महत्‍त्‍वाची भूमिका बजावते आणि या व्‍यस्‍त कामामध्‍ये माझे मन व शरीरामध्‍ये संतुलन राखण्‍यामध्‍ये मदत करते.

  • तुझा आव्‍हानात्‍मक व व्‍यस्‍त नित्‍यक्रम पाहता तू तंदुरूस्‍त राहण्‍यासह आरोग्‍यदायी जीवनशैली कशाप्रकारे राखतोस?

मी सर्वकाही खातो, पण कमी प्रमाणात. माझी चयापचय क्रिया काहीशी कमी असल्‍यामुळे मी दर २ तासांनी खाण्‍याची काळजी घेतो. माझे मन स्थिर व स्‍वस्‍थ ठेवण्‍यासाठी मी वेळ मिळाल्‍यास विश्रांती घेण्‍याचा प्रयत्‍न करतो.

  • तुझा चालता-फिरता आवडता आरोग्‍यदायी स्‍नॅक कोणता?

सलाड हा माझा चालता-फिरता आरोग्‍यदायी स्‍नॅक आहे. मला सेरेअल सलाड, वेजीटेबल सलाड, फ्रूट सलाड असे विविध प्रकारचे सलाड आवडतात.

  • तुझ्या भोजनामध्‍ये कोणत्‍या पदार्थांचा समावेश असतो?

माझ्या भोजनामध्‍ये पनीर मखनी सारखे अनेक भारतीय पदार्थ आणि तूपामध्‍ये तयार केलेल्‍या पदार्थांचा समावेश असतो. मी मारवाडी आहे आणि मला माझ्या भोजनादरम्‍यान दाल बातीचूर्मा सारखे राजस्‍थानी पदार्थ खायला आवडतात.

  • एखादा पदार्थ जो तू खाल्‍ल्‍याशिवाय राहू शकत नाही?

दाल बातीचूर्मा हा माझा आवडता पदार्थ आहे आणि तो खाल्‍ल्‍याशिवाय मी राहू शकत नाही.

  • तुझे चाहते व प्रेक्षकांसाठी काही फिटनेस सूचना?

मला माझ्या चाहत्‍यांना सांगावेसे वाटते की, तंदुरूस्‍त राहणे म्‍हणजे व्‍यायामशाळेत जाऊन जड वजन उचलणे नाही. तुम्‍हाला उत्‍साही, आनंदी व आरामदायी ठेवणा-या लहान-लहान कृती केल्‍याने देखील तंदुरूस्‍त राहता येते. तुमच्‍या शरीराला स्‍वस्‍थ ठेवण्‍याबरोबरच मन:शांती राखणे देखील महत्‍त्‍वाचे आहे. तर मग योग्‍य आणि मर्यादित प्रमाणात पदार्थांचे सेवन करा.

सोनी सबवरील मालिका तेनाली रामा मध्‍ये शीर्षक भूमिका साकारणारा अभिनेता कृष्‍णा भारद्वाजने सांगितले आपले फिटनेस गुपित
educratsweb.com

Posted by: educratsweb.com

I am owner of this website and bharatpages.in . I Love blogging and Enjoy to listening old song. ....
Enjoy this Author Blog/Website visit http://twitter.com/bharatpages

if you have any information regarding Job, Study Material or any other information related to career. you can Post your article on our website. Click here to Register & Share your contents.
For Advertisment or any query email us at educratsweb@gmail.com

RELATED POST
1. सोनी सबवरील मालिका तेनाली रामा मध्‍ये शीर्षक भूमिका साकारणारा अभिनेता कृष्‍णा भारद्वाजने सांगितले आपले फिटनेस गुपित
सोनी सबवरील मालिका तेनाली रामा मध्‍ये शीर्षक भूमिका साकारणारा अभिनेता कृष्‍णा भारद्वाजने सांगितले आपले फिटनेस गुपित तुझ्या मते फिटनेसचा अर्थ काय आहे?
2. सोनी सब के ‘तेनाली रामा’ में मुख्‍य भूमिका निभा रहे कृष्‍णा भारद्वाज ने खोले फिटनेस के राज
सोनी सब के ‘तेनाली रामा’ में मुख्‍य भूमिका निभा रहे कृष्‍णा भारद्वाज ने खोले फिटनेस के राज आपके लिये फिटनेस का क्‍या मतलब है? मेरे लिये फिटनेस का मतलब है स्‍वस्‍
We would love to hear your thoughts, concerns or problems with anything so we can improve our website educratsweb.com ! visit https://forms.gle/jDz4fFqXuvSfQmUC9 and submit your valuable feedback.
Save this page as PDF | Recommend to your Friends

http://educratsweb(dot)com http://educratsweb.com/content.php?id=828 http://educratsweb.com educratsweb.com educratsweb